लखनऊ: कोरोना संकटाचे देशभरात थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव अंशतः कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू अद्यापही चिंतेत भर टाकणारे ठरत आहेत. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना दिसत आहे. विरोध आणि सत्ताधारी पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधाननरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे. (bjp swatantra dev singh says pm modi well handled corona situation in country)
स्वतंत्र देव सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सदर विधान केले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस सत्तेत असती, तर काय झाले असते, याची कल्पना करवत नाही, अशी टीका त्यांनी केली. मात्र, यानंतर सोशल मीडियावर स्वतंत्र देव सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असून, ते ट्रोलही झाल्याची माहिती मिळाली आहे.
‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली
काँग्रेस एक नंबरचा खोटारडा पक्ष
कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना कशा प्रकारे मदत पोहोचवायची, लाभ मिळवून द्यायचे, यासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ उत्तम प्रकारे काम करत आहेत. परिस्थिती हाताळत आहेत. काँग्रेस हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. सर्वांना आता हे माहिती झाले आहे. पंतप्रधान मोदी आहेत म्हणून देश वाचला आहे, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक, असे स्वतंत्र देव सिंह यावेळी बोलताना म्हणाले.
“ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”
पंतप्रधान मोदींची संकटात संधी
स्वतंत्र देव सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ अनेक आघाड्यांवर लढत आहेत. आव्हान, संकटाचे रुपांतर संधीत करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. समाजाचा सहयोग त्यांना मिळत आहे. गाव, गरीब आणि शेतकरी बंधू या संकटातून कसे वाचतील, हे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, स्वतंत्र देव सिंह यांना अशा वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.