नवी दिल्ली - अयोध्येत बुधवारी (5 ऑगस्ट) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं होतं. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने ट्विट केलं आहे.
कर्नाटकमधील बंगळूर दक्षिणचे भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी 'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील' असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलेलं असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे. धर्म टिकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
"प्रिय हिंदू बांधवांनो, हिंदूंचं राज्यातील सत्तेवर नियंत्रण असणं हे धर्मासाठी आवश्यक आहे. हा सर्वात महत्वाचा धडा आहे. जेव्हा आपल्याकडे राज्याचे नियंत्रण नव्हते तेव्हा आपण आपले मंदिर गमावले. जेव्हा आपण (सत्तेत) परत आलो तेव्हा पुन:निर्माण केलं. 2014 मध्ये 282 आणि 2019 मध्ये 303, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झालं आहे" असं ट्विट तेजस्वी सूर्या यांनी केलं आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयामधील माजी सरकारी वकील असणाऱ्या बी. टी. व्यंकटेश यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यांच्या या विधानावर आक्षेप व्यक्त घेतला आहे. 'तेजस्वी यांचे विधान एका मोठ्या आणि सुशिक्षित शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला शोभणारं नाही. त्यांचे वक्तव्य हे संविधानातील भावनांच्या विरोधातील आहे' असं व्यंकटेश यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Breaking: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जैसे थे; आरबीआयकडून EMI सवलतीवर सस्पेन्स कायम
CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही...
बापरे! कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 लोकांचा मृत्यू, 60 जणांना लागण