शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

चहानंतर आता टिफिनवर चर्चा, भाजपने बनवला 2024 साठी प्लॅन, जाणून घ्या रणनीती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 4:15 PM

या मोहिमेअंतर्गत मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरी देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप काम करणार आहे.

नवी दिल्ली : भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोठ्या जाहीर सभेने सुरू झालेली ही मोहीम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरी देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप काम करणार आहे. तसेच, या मोहिमेद्वारे अशा लोकांना योजनांशी जोडले जाईल, जे काही कारणास्तव वंचित राहिले आहेत.

यासोबतच काही अनोखे प्रयोगही या मोहिमेत केले जात आहेत. जेणेकरून नाराज कार्यकर्ते व नेत्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा सक्रिय करून त्यांचा निवडणुकीत वापर करता येईल. या अभिनव आणि आगळ्यावेगळ्या प्रयोगाला 'टिफिन बैठक' असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते 3 जून रोजी आग्रा येथून पहिल्या टिफिन बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. भाजपच्या प्रत्येक आमदार आमि खासदाराला या टिफिन बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, तरुण चुग आणि विनोद तावडे यांना या मोहिमेचे प्रभारी बनवण्यात आले आहे. विधानसभा स्तरावर या बैठका होणार आहेत. यामध्ये आमदार, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे या सभेला उपस्थितांना आपापल्या घरून स्वतःचा टिफीन आणावा लागेल आणि सर्वजण एकत्र जेवतील आणि चर्चा करतील. यादरम्यान तक्रारी दूर करून आमदार, खासदार आपले कर्तृत्व सर्वांसमोर मांडतील.

नरेंद्र मोदींनी सुरू केली होती टिफिन बैठक! गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिफिन बैठक सुरू केली होती. नरेंद्र मोदी दर महिन्याला अशा टिफीन बैठका घेत असत आणि त्यात आपल्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असत. जेवताना ते कधी-कधी कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायचे, त्यामुळे त्यांना अभिप्राय मिळायचा. यासोबतच सुशासनाच्या संदर्भात काही सूचनाही मिळाल्या आणि सरकार कसे काम करत आहे, याची माहितीही मिळत होती.

आरएसएसची संकल्पना पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी पक्ष नेतृत्व आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना अशा बैठका घेण्याचा आग्रह केला. अनेक वेळा ते आपल्या मंत्र्यांना टिफिन बैठकीबद्दल विचारायचे, तुम्ही किती टिफिन बैठकी केल्या आहेत. ही संकल्पना आरएसएसची असल्याचे मानले जात असले तरी. आरएसएस सुरुवातीपासून 'सहभोज' या नावाने अशा सभा घेत आला आहे. समन्वयाच्या दृष्टीने 'सहभोज' अत्यंत प्रभावी मानला जातो आणि या सहभोज प्रकारातूनच संघ समाजातील जातिव्यवस्था संपविण्याच्या मोहिमेत गुंतला आहे.

पीएम मोदींनी टिफिन बैठक घेण्याची केली होती विनंती प्रत्येक जाती समाजाचे लोक आपापल्या घरून जेवण आणतात आणि जातपात न पाहता एकमेकांच्या जेवणाचा आस्वाद घेतात आणि चर्चा करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असताना, या भव्य मोहिमेची रूपरेषा तयार केली जात होती. त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना टिफिन बैठका घेण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांच्याकडे या बैठकांची सूत्रे सोपवण्यात आली होती.

४००० विधानसभा मतदारसंघात टिफिन बैठकीचे आयोजनभाजपतर्फे महासंपर्क अभियानांतर्गत केवळ २ महिन्यांत देशभरातील ४००० विधानसभा मतदारसंघात टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे नाराज कार्यकर्त्यांना वेळीच सक्रिय करता येणार असून प्रत्येक बैठकीची माहिती व अभिप्राय भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. याच्या मुल्यांकनाच्या आधारे भाजप पुढील निवडणुकीच्या रणनीतीला धार देईल.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीj. p. naddaजे. पी. नड्डा