अहमदाबाद - गुजरातमध्येजिल्हा परिषदांसाठी (District Panchayat) झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीचे निकाल येताच भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व 31 जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी 29 जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. (BJP victory in Gujarat district panchayat election)
गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या!
31 जिल्ह्यांत भाजपचा झेंडा -भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. पंचमहाल येथे तर काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. तर तापी जिल्ह्या परिषदेवर भाजपने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. 2015 मध्ये 31 जिल्हा परिषदांपैकी काँग्रेसने 22 जिल्हा परिषदांमध्ये विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ 7 ठिकानीच विजय मिळाला होता.
आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया - ही जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत खराब ठरली. विशेष म्हणजे बालेकिल्ले म्हणवल्या जाणाऱ्या जिल्ह्यांतही काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. महत्वाचे म्हणजे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते परेश धनानी यांना स्वतःच्या मतदार संघातही काँग्रेसला विजयी करता आले नाही. येथेही काँग्रेसचा मोठा पराभव झाला. एवढेच नाही तर आपला दबदबा असलेल्या साबरकांठा आणि जामनगर जिल्ह्या परिषदेतही काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ आली.
नगरपालिका अन् पंचायत समितीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदीचं 'क्लिअर' ट्विट
दुहेरी आकडाही गाठता आला नाही - गुजरात जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेतेही आपल्या उमेदवारांना विजयी करू शकले नाही. अमित चावडा, भरत सिंह सोलंकी, अश्विन कोटवाल, विक्रम माडम यांसारख्या नेत्यांच्या भागांतही भाजपने जबरदस्त विजय मिळवला. विशेष म्हणजे येथे काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. असे मानले जाते की गुजरातच्या शहरी भागांत भाजपचा, तर ग्रामीण भागांत काँग्रेसचा दबदबा आहे. मात्र, यावेळी भाजपने ग्रामीण भागातही काँग्रेसचा पार साफया केल्याचे दिसत आहे.