शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 22:32 IST

कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे.

बंगळुरु : तुमकुरच्या काँग्रेस खासदाराचे तिकीट कापून जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा यांना ती जागा दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यातच आज कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जेडीएसचे नेते एच डी रेवन्ना यांना अपमानाचा सामना करावा लागला आहे. देवेगौडांचा नातू आणि रेवन्नांचा मुलगा प्रज्वल याला मत घालण्यापेक्षा आम्ही भाजपाला मत घालू, असा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भरसभेत दिला आहे. प्रज्वल हे हासन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. 

कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. या ठिकाणीही काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. यामुळे तिन्ही जागांवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध देवेगौडांना होत आहे. हासन मतदारसंघाचे नेतृत्व यापूर्वी देवेगौडा करत होते. 

शुक्रवारी एका सभेमध्ये रेवन्ना यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जेडीएस उमेदवाराला मदत करण्याचे आवाहन केले. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यास साफ नकार दिला. धक्कादायक म्हणजे रेवन्ना हे हातामध्ये 6-7 लिंबू घेऊन गेले होते. त्यांचा ज्योतिषशास्त्रावर मोठा विश्वास आहे. 

ज्याची भीती होती तेच घडले...रेवन्ना हे हातात लिंबू कधी ठेवत नाहीत. आज त्यांनी त्यांच्या मुलाच्या राजकीय वाटचालीत अडचणी येऊ नयेत यासाठी ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार लिंबू ठेवली होती. मात्र, जे व्हायचे तेच घडले. ते जेव्हा मंचावरील खुर्चीवर बसले तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तसेच जेडीएसला समर्थन देण्याऐवजी भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा इशारा दिला. मंचावरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो अयशस्वी ठरला. काँग्रेसचे आम्ही बांधलेले नाही. कट्टर काँग्रेसी असले तरीही जेडीएस नको. भाजपालाच्या उमेदवाराला मतच घालणार नाही, तर त्यांच्या उमेदवारासाठी मतेही मागणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. 

टॅग्स :h d deve gowdaएच. डी. देवेगौडाkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Karnatakकर्नाटकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019