शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

देशविरोधी प्रचार, चिनी फंडिंग; लोकसभेत गाजला NEWS CLICK चा मुद्दा; भाजपने काँग्रेसला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 2:52 PM

न्यूज क्लिक सरकारविरोधी असून, चीनच्या निधीद्वारे सरकारविरोधात वातावरण तयार करत असल्याचा आरोप.

LokSabha News: आज लोकसभेत न्यूज क्लिक (NEWS CLICK) मीडिया पोर्टलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dube) म्हणाले यांनी NEWS CLICK ला देशविरोधी म्हटले आणि चीनकडून निधी मिळत असल्याचा दावा केला. यासोबतच मीडिया पोर्टलवर चीनच्या निधीद्वारे सरकारविरोधात वातावरण निर्माण केल्याचा आरोपही केला. एवढंच नाही तर निशिकांत यांनी या मुद्द्यावरुन काँग्रेसवरही टीका केली. 

यानंतर केंद्रीय आयटी मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर भाष्य केले. 'न्यूयॉर्क टाईम्स' सारखी वृत्तपत्रे देखील मान्य करत आहेत की, नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक पोर्टल कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) चे धोकादायक शस्त्र आहे आणि जगभरात चीनच्या राजकीय अजेंडाचा प्रचार करत आहे,' अशी माहिती ठाकूर यांनी दिली. 

राहुल गांधींच्या 'मोहब्बत की दुकान' मध्ये चायनीज माल 

ठाकूर पुढे म्हणाले की, काँग्रेसची 'मोहब्बत की दुकान' न्यूज क्लिकशी संबंधित असल्याचा दावाही अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले की, राहुल गांधींच्या बनावट 'मोहब्बत की दुकान'मध्ये चिनी वस्तू आहेत. न्यूज क्लिक सुरू झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. हा भारतविरोधी अजेंडा आम्ही चालू देणार नाही. चीनबद्दलचे प्रेम आणि परदेशातून विदेशी वृत्तसंस्थांच्या माध्यमाद्वारे भारताविरोधात अपप्रचार प्रचार केला जात होता. हे लोक अँटी इंडिया आणि ब्रेक इंडिया मोहीम चालवायचे,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.  

अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला घेरलेन्यूयॉर्क टाईम्सपूर्वी भारत जगाला सांगतोय की, न्यूजक्लिक चिनी प्रचाराचे धोकादायक वेब आहे. समविचारी शक्तींच्या पाठिंब्याने नेव्हिल भारतविरोधी अजेंडा पुढे ढकलतोय. 2021 मध्ये जेव्हा एजन्सींनी मनी लाँड्रिंगच्या भक्कम पुराव्याच्या आधारे न्यूजक्लिकच्या विरोधात तपास सुरू केला, तेव्हा काँग्रेस आणि संपूर्ण डाव्या-उदारमतवादी इकोसिस्टमने त्यांचा बचाव केला. हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्यांनी  2008 मध्ये भारतातील चिनी हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी CPC सोबत सामंजस्य करार केला आणि चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशन (RGF) ला कथितपणे देणग्या स्वीकारल्या? UPA हजार वेळा नाव बदलू शकते, पण अहंकारी युतीच्या हातात देश सुरक्षित राहणार नाही, हे आता लोकांना माहीत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काय प्रकरण आहे?मीडिया पोर्टल न्यूजक्लिकला परदेशातून सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात आढळून आले होते. अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघमकडून न्यूजक्लिकला सातत्याने निधी दिला जात असल्याचे तपासात आढळून आले. नेव्हिलवर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) सोबत संबंध असल्याच्या आरोप आहे. आता याबाबत 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तातही अॅक्टिव्हिस्ट ग्रुप, काही संस्था आणि शेल कंपन्यांचे चीनसोबतचे नेटवर्क उघड झाले आहे. नेव्हिल रॉय सिंघम या संपूर्ण नेटवर्कच्या केंद्रस्थानी आहे. 

 

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाchinaचीन