BJP-Congress: काँग्रेसने(Congress) देशभर 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रा सुरू केली आहे. स्वतः राहुल गांधी इतर काँग्रेस नेत्यांसह या देशभर फिरणार आहेत. यादरम्यान काँग्रेसने RSSबद्दल केलेल्या एका ट्विटवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या ट्विटवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधला. गांधी कुटुंबाच्या सांगण्यावरूनच संघाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसच्या ट्विटवरून वाद वाढलाकाँग्रेसने भारत जोडो यात्रेदरम्यान अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले, ज्यामध्ये आरएसएसच्या पोशाखाला आग लावल्याचे दिसत आहे. या फोटोवर 'अजून 145 दिवस बाकी' असेही लिहिले आहे. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने आम्ही एक-एक पाऊल टाकत आहोत,' असे लिहिले आहे.
जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया टाळलीकाँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या ट्विटवर काहीही बोलण्यास नकार दिला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 'मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर त्यांना (भाजप) कंटेनर, शूज किंवा टी-शर्टबद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते घाबरले आहेत आणि काहीही बोलू शकतात हे दिसून येत आहे. यावर बोलणे बालिशपणाचे असेल. सोशल मीडियावर 'लबाडांची फॅक्टरी' ओव्हरटाईम करत आहे,' असे ते म्हणाले.