BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:47 PM2022-09-21T20:47:39+5:302022-09-21T20:47:39+5:30

भ्रष्टाचारावरून काँग्रेस-भाजपामध्ये 'बारकोड स्पेशल' पोस्टरवॉर

BJP vs Congress Karnataka Politics barcode scanning poster war | BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

googlenewsNext

BJP vs Congress, Karnataka Politics: कर्नाटकातील सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे क्यूआर कोडचे पोस्टर वापरल्याचे दिसत आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसने सर्वप्रथम 'PayCM' असे टोलेबाजी करणारे पोस्टर रिलीज केले. त्यानंतर भाजपाने आता बुधवारी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या क्यूआर कोड रिलीज करत पोस्टरला चोख प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसने लावलेल्या 'PayCM' पोस्टरवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे छायाचित्र आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे त्यात दिलेला QR कोड स्कॅन करणारे लोक 40% sarkar.com वेबसाइटवर जातात. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या या पोस्टर्समुळे राज्यात दोन्ही पक्षांमध्ये नव्या राजकीय युद्धाला तोंड फुटले आहे. पण याच दरम्यान बंगळुरूमधील अधिकाऱ्यांनी BBMP कर्मचार्‍यांना भिंतीवरील पोस्टर्स  काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत भाजपचे आमदार एम रविकुमार यांनी टोला लगावला आहे की, काँग्रेस नेत्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रचारासाठी वापरला आहे. अशा लोकांनी राहुल गांधींना पैसे द्यावेत.

भाजपाचे रविकुमार म्हणाले की सिद्धरामय्या यांना घड्याळाची गरज आहे (हबलेट घड्याळ प्रकरणाचा संदर्भ देत) आणि त्यांना पैसे देऊ द्या. माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी चार पिढ्यांपासून पैसे कमावले आहेत, त्यांना पैसे देऊ द्या, असेही जाहीरपणे म्हटले. या सोबतच मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक संयम पाळायला हवा, असेही ते म्हणाले. काँग्रेस आमदार आणि मीडिया प्रभारी प्रियांक खर्गे म्हणाले की, 'PayCM' मोहीम वैयक्तिक नाही. सार्वजनिक ठिकाणी जी काही चर्चा होते ती प्रसिद्धीसाठी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

याशिवाय, कथित भाजपाने जारी केलेल्या पोस्टरमध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची छायाचित्रे आहेत, ज्यात लोकांना राज्य लुटण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगितले आहे आणि व्यवस्था नष्ट करण्यासाठी दोघांना राज्यातून उखडून टाकण्यास सांगितले आहे. राज्याचा नाश कसा करायचा, खोटेपणा कसा पसरवायचा आणि शांतता कशी बिघडवायची यावर दोघे चर्चा करत आहेत, असा टोला लगावण्यात आला आहे.

Web Title: BJP vs Congress Karnataka Politics barcode scanning poster war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.