BJP vs Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ट्विटर हा या लढाईचा आखाडा बनला आहे. काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी छोट्या रुपात दिसत आहेत. काँग्रेसच्या या ट्विटवर भाजपने प्रत्युत्तर देत पंडित नेहरूंची रील लाइफमध्ये खूप उंची दाखवली, तर खऱ्या आयुष्यात ते खूपच लहान असल्याचे दाखवण्यात आले आहे.
काँग्रेसने काय म्हटले...
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी काँग्रेसने एक जवाहरलाल नेहरुंचा फोटो ट्विट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "तुम्ही कितीही प्रयत्न करा". या चित्रात पंतप्रधान मोदी आणि पंडित नेहरू दाखवले आहेत. पंतप्रधान मोदींना पंडित नेहरूंच्या पायाजवळ छोट्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. तर नेहरूंचा आकार खूप जास्त दाखवण्यात आला आहे.
भाजपचे प्रत्युत्तरयानंतर भाजपनेही जवाहरलाल नेहरूंचा एक फोटो अपलोड केला, ज्यात कॅमेरा फोकसमध्ये त्यांचा मोठा फोटो आणि खऱ्या आयुष्यात लहान फोटो दाखवला आहे. भाजपने हा फोटो 'reel vs real' टॅगसह शेअर केला आहे. नेहरू कॅमेर्यासमोर मोठे दिसतात, तर दुसरीकडे त्यांचे छोटेसे चित्र कॅमेर्याखाली दिसतेते. भाजपने या फोटोसोबत नेहरूंचे सत्य, कॅप्शन लिहिले.