ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 04:38 PM2020-02-22T16:38:49+5:302020-02-22T16:43:27+5:30

ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला.

bjp vs congress over trumps visit expenditure | ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार

ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार

Next

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील कार्यक्रमासाठी एका समितीद्वारे खर्च करण्यात येत असलेल्या 100 कोटी रुपयांवर काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावर भाजपने सडेतोड उत्तर दिले आहे.  

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खर्च करण्यात येत असलेल्या पैशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी ट्विट करून म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या आगमनावर 100 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र हा पैसा एका समितीद्वारे खर्च होत आहे. समितीच्या सदस्यांना देखील ठावूक नाही की ते त्या समितीचे सदस्य आहेत. या समितीला कोणत्या मंत्रालयाने किती पैसे दिले हे माहित करून घेण्याचा हक्क जनतेला नाही का, असा सवाल प्रियंका यांनी केला, तसेच समितीच्या आडून सरकार काय लपवत आहे, असंही त्यांनी विचारले आहे. 

यावर भाजपने कडक शब्दांत उत्तर दिले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा जगातील सर्वात जुन्या लोकशाहीशी हितगुज आहे. अशा स्थितीत काँग्रेसला आनंद का होत नाही. जागतीक पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढत असूनही काँग्रेस खुश नसल्याचे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले. 

ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला. तसेच खुद्द ट्रम्प यांनी अनेकदा भारत व्यवहारात फारच चिकाटीने वागतो, असं म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने देशाची चिंता करणे सोडावे, असंही पात्रा यांनी स्पष्ट केले. 

Web Title: bjp vs congress over trumps visit expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.