उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपा, काँग्रेस, सपा, बसपा यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपासाठी (BJP) उत्तर प्रदेश हे राज्य खूप महत्वाचे असल्याने त्यांना सत्ता टिकविणे राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणासाठी फायद्याचे आहे. कारण लोकसभेच्या सर्वाधिक जागा या उ. प्रदेशमध्येच आहेत. यामुळे भाजपाने निषाद पार्टी आणि अपना दलासोबत आघाडी (BJP Nishad Party Alliance) केली असून दोन्ही पक्षांना योग्य पद्धतीने जागा देण्यात येतील अशी घोषणा आज करण्यात आली आहे. (BJP Nishad Party Alliance declaired in Uttar Pradesh Election.)
आज भाजपाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी धर्मेंद्र प्रधान, प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव आणि निषाद पार्टीचे संजय निषाद हे उपस्थत होते. भाजपात निषाद पार्टीचे विलिनीवरण करणार नसल्याचे निषाद यांनी सांगितले. तसेच निषाद पार्टी आपल्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचेही ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून मी उत्तर प्रदेशमध्ये आहे. निषाद पार्टीसोबत आपली आघाडी आणखी मजबूत होईल. 2022 ची विधानसभा एकत्र लढली जाईल. ही आघाडी भाजपा, निषाद आणि अपना दलाची आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावर लढली जाणार आहे. लोकांनाही या दोघांवर विश्वास आहे. निषाद पार्टी आणि अपना दलाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
जितिन प्रसाद, संजय निषाद आणि बेबी रानी मौर्य सह अन्य एका नेत्याला विधानपरिषदेवर घेण्यात येणार असल्याची र्चा आहे.