Assembly Election 2021: बंगालमधील हिंसाचाराचा निषेध; भाजप उद्या राज्यभर निदर्शने करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 05:50 PM2021-05-04T17:50:09+5:302021-05-04T17:51:58+5:30

Assembly Election 2021: बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

bjp will hold statewide protests against violence in west bengal after assembly election result | Assembly Election 2021: बंगालमधील हिंसाचाराचा निषेध; भाजप उद्या राज्यभर निदर्शने करणार

Assembly Election 2021: बंगालमधील हिंसाचाराचा निषेध; भाजप उद्या राज्यभर निदर्शने करणार

Next
ठळक मुद्देबंगालमधील हिंसाचाराचा निषेधभाजप उद्या राज्यभर निदर्शने करणारभाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा

मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. मात्र, यानंतर आता बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बंगालमधील हिंसाचाराचा निषेध म्हणून भाजप राज्यभरात निदर्शने करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. (bjp will hold statewide protests against violence in west bengal after assembly election result)

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून, भाजपा कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे, असे उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या, बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

बंगालमध्ये सुडाचे राजकारण
 
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत ममता दीदींचे कार्यकर्ते हिंसक जल्लोष करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या घरांचे नुकसान करत आहेत. नंदीग्राम येथेही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून, भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, असा दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.
 

Web Title: bjp will hold statewide protests against violence in west bengal after assembly election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.