काल गुजरात निवडणुकीचे निकाल समोर आले, गुजरातमध्ये भाजपने वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने १५६ जागांवर विजय मिळवला आहे. विरोधकांचा भाजपाने सुफडा साफ केला. आता या विजयामुळे भाजपला मोठा फायदा होणार आहे. भाजपने आपलाच विक्रम मोडत नवा विक्रम केला आहे. आता भाजप राज्यसभेतही नवा विक्रम या विजयामुळे करणार आहे.
यामुळे भाजप राज्यसभेत मजबूत होणार आहे. लवकरच आता गुजरातमधून भाजपच्या ११ खासदारांची नियुक्ती होणार आहे. सध्या गुजरातमधून भाजपचे ८ खासदार आहेत, आता विधानसभेत जागा वाढल्यामुळे ही संख्या ११ होणार आहे. पुढच्या राज्यसभेत तीन जागांसाठी भाजपकडून तीन खासदारांना संधी देण्यात येणार आहे.
भाजपला एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत चार पैकी दोन अतिरिक्त जागा आणि जून 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत अन्य चार पैकी आणखी एक जागा मिळून गुजरातमधील राज्यसभा खासदारांची एकूण संख्या 11 वर जाईल. सध्या हिमाचल, दिल्ली, पंजाब, तेलंगणा आणि उत्तराखंड ही पाच राज्ये आहेत जिथे राज्यसभेच्या सर्व जागा एकाच पक्षाकडे आहेत.