शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

भाजप मित्रपक्षांना देणार नाही महत्त्वाची खाती; मोदींच्या देखरेखीखाली नव्या मंत्र्यांची यादी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 10:58 AM

कोणत्याही मित्र पक्षाने लोकसभा अध्यक्षपद किंवा गृह, संरक्षण, वित्त व परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली नसल्याचे समोर आले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नवीन मंत्रीमंडळाला अंतिम रूप देत आहेत. नवे मंत्री या आठवड्याच्या शेवटी त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळचे मंत्रीमंडळ बऱ्यापैकी ‘जंबो’ असेल. मोदींनी मित्रपक्षांशी बोलून मंत्रिपदासाठीची नावे निश्चित करण्याचे काम यापूर्वीच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सोपवले आहे. हा तीन सदस्यीय गट भाजपच्या प्रादेशिक नेत्यांशीही बोलत आहे.

कोणत्याही मित्र पक्षाने लोकसभा अध्यक्षपद किंवा गृह, संरक्षण, वित्त व परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली नसल्याचे समोर आले आहे. अर्थात, गतिमान विकासाच्या त्यांच्या स्वतःच्या काही प्रादेशिक आकांक्षा आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हरयाणा, महाराष्ट्रासह त्यांच्या राज्यात लवकर विधानसभा निवडणुका घेण्यास इच्छुक आहेत. नीती आयोगाच्या कक्षेबाहेर विशेष दर्जा देण्याची त्यांची मागणी असून, त्यांना अग्निवीर योजनेतही बदल हवे आहेत.

भाजपच्या १६ मित्रपक्षांना मंत्रिपदे देण्याचा फॉर्म्युला तयार केला जात आहे. प्रत्येक पक्षाला एक मंत्रिपद दिले जाणार असून, लोकसभेत ४-५ पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षांना दोन ते तीन मंत्रिपदे मिळू शकतात. मंत्रीमंडळात शिवराज सिंह चौहान यांच्यासह प्रादेशिक नेत्यांचा समावेश असू शकतो. २०२४-२५मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने दिग्गजांचा समावेश करावा लागू शकतो.

मोदींकडे आघाडी सरकार चालविण्याचे कसब  मोदींनी गुजरात व केंद्रात २३ वर्षे एकहाती सरकार चालवले. त्यांना आघाडी सरकार चालविण्याचा अनुभव नाही, हे खरे असले तरी त्यांच्याकडे असे सरकार चालविण्याचे कसब आहे, असे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे. मोदींनी लवचिकता दाखवत भूसंपादन विधेयक व कृषी कायदे मागे घेतले, ही बाब त्यांच्याकडे आघाडी सरकार चालवण्याचे कसब असल्याची निदर्शक आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान आश्वासन पूर्ण करतील का? तिसऱ्यांदा मोदी सरकार (३.०) स्थापन होणार असल्याचा दावा वारंवार केला जात आहे, परंतु सत्य हे आहे की, यावेळी ते “मोदी १/३ सरकार” असेल. आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन, पंतप्रधान पूर्ण करणार का. आंध्र प्रदेशच्या तिरुपती शहरात नरेंद्र मोदी यांनी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आता १० वर्षे झाली आहेत, पण ते पूर्ण झालेले नाही. ते वचन कधीपर्यंत पूर्ण होईल? पंतप्रधानांनी २०१४ च्याच निवडणुकीत बिहारलाही विशेष दर्जा देऊ असे म्हटले होते, हि मागणी त्यांचे मित्रपक्ष जदयूनेही केली होती, नितीश कुमार याबद्दल आग्रही होते.                 - जयराम रमेश, काँग्रेस नेते

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा