पुढील अनेक वर्षे देशात भाजपाचंच वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही, प्रशांत किशोर यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:45 AM2021-10-28T11:45:32+5:302021-10-28T11:46:23+5:30
Prashant Kishor News: लोक Narendra Modi यांना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण BJP कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.
नवी दिल्ली - राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपाची ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. भाजपा येणाऱ्या अनेक दशकांमध्ये भारतीय राजकारणात एक प्रबल शक्ती म्हणून कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक दशके लढावे लागेल. ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे काँग्रेस सत्तेचे केंद्र राहिली होती. त्याचप्रमाणे भाजपा हरो अथावा जिंको ती सत्तेच्या केंद्रामध्ये कायम राहील. जेव्हा एखादा पक्ष ३० टक्के मते मिळवतो तेव्हा तो राजकारणाच्या केंद्रातून लवकर हटत नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण भाजपा कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.
यावेळी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींबाबतही मोठे विधान केले आहे, ते म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची एक अडचण आहे. कदाचित काही काळातच जनता नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.
किशोर पुढे म्हणाले की, तुम्ही कुठल्याही काँग्रेस नेत्याशी किंवा प्रादेशिक नेत्याशी जाऊन बोललात तर ते सांगणार की आता केवळ काही वेळेचीच बाब आहे. लोक मोदींवर नाराज आहेत. सत्ताविरोधी लाट येईल आणि जनता त्यांना सत्तेतून बाहेर काढेल, पण असे होणार नाही.
व्होटर बेस पाहिला तर ही लढाई एक तृतियांश आणि दोन तृतियांशामधील आहे. केवळ एक तृतियाश लोक भाजपाला मत देतात. मात्र उर्वरित दोन तृतियांश मतदार एवढा विखुरलेला आहे की, तो १०,१२ किंवा १५ राजकीय पक्षांमध्ये विभाजित आहे आणि हेच काँग्रेसच्या पतनाचे मुख्य कारण आहे. काँग्रेसला असलेला जनतेचा पाठिंबा कमी कमी होत गेला आहे. ६५ टक्के जनाधार विखुरला आहे. त्यामुळे अनेल लहान लहान पक्ष तयार झाले आहेत.