शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

पुढील अनेक वर्षे देशात भाजपाचंच वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही, प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:45 AM

Prashant Kishor News: लोक Narendra Modi यांना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण BJP कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

नवी दिल्ली - राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपाची ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. भाजपा येणाऱ्या अनेक दशकांमध्ये भारतीय राजकारणात एक प्रबल शक्ती म्हणून कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक दशके लढावे लागेल. ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे काँग्रेस सत्तेचे केंद्र राहिली होती. त्याचप्रमाणे भाजपा हरो अथावा जिंको ती सत्तेच्या केंद्रामध्ये कायम राहील. जेव्हा एखादा पक्ष ३० टक्के मते मिळवतो तेव्हा तो राजकारणाच्या केंद्रातून लवकर हटत नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण भाजपा कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल.

यावेळी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींबाबतही मोठे विधान केले आहे, ते म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची एक अडचण आहे. कदाचित  काही काळातच जनता नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.

किशोर पुढे म्हणाले की, तुम्ही कुठल्याही काँग्रेस नेत्याशी किंवा प्रादेशिक नेत्याशी जाऊन बोललात तर ते सांगणार की आता केवळ काही वेळेचीच बाब आहे. लोक मोदींवर नाराज आहेत. सत्ताविरोधी लाट येईल आणि जनता त्यांना सत्तेतून बाहेर काढेल, पण असे होणार नाही.

व्होटर बेस पाहिला तर ही लढाई एक तृतियांश आणि दोन तृतियांशामधील आहे. केवळ एक तृतियाश लोक भाजपाला मत देतात. मात्र उर्वरित दोन तृतियांश मतदार एवढा विखुरलेला आहे की, तो १०,१२ किंवा १५ राजकीय पक्षांमध्ये विभाजित आहे आणि हेच काँग्रेसच्या पतनाचे मुख्य कारण आहे. काँग्रेसला असलेला जनतेचा पाठिंबा कमी कमी होत गेला आहे. ६५ टक्के जनाधार विखुरला आहे. त्यामुळे अनेल लहान लहान पक्ष तयार झाले आहेत.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा