Hubli-Dharwad Election Result: हुबळी-धारवाडमध्ये भाजपाची हॅट्ट्रिक; तिसरी महापालिका काँग्रेसला तारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:43 PM2021-09-06T14:43:34+5:302021-09-06T14:56:35+5:30
BJP's hat-trick in Hubli-Dharwad: हुबळी धारवाड (Hubballi-Dharwad) महापालिकेत भाजपाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने कडवी टक्कर दिली आहे.
Karnataka municipal election results 2021: बेळगावमध्येभाजपाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वर्चस्वाला सुरुंग लावत महापालिका ताब्यात घेतलेली असताना हुबळी-धारवाड पालिकाही भाजपाने तिसऱ्यांदा ताब्यात ठेवली आहे. हुबळी धारवाड (Hubballi-Dharwad) महापालिकेत भाजपाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने कडवी टक्कर दिली आहे. (Karnataka municipal election results 2021: two corporation in BJP's control, but have to fight for Kalburgi.)
हुबळी-धारवाड महापालिकेत भाजपा 39 जागांवर आघाडीवर असून आहे. तर काँग्रेस 33 जागांवर, अपक्षांनी 6 जागा, जेडीएस 1 आणि एआयएमआयएमने 3 जागांवर आघाडीवर आहेत. एकूण 82 जागांपैकी 70 जागांचे निकाल आले असून भाजपा 34, काँग्रेस 27, जेडीएस 1, AIMIM 2 व अपक्षांनी 6 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 42 जागांची आवश्यकता आहे. (Hubballi-Dharwad Election Result.)
तर दुसरीकडे भाजपाने बेळगाव महापालिका हिसकावून आणली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ताब्यात ही महापालिका गेले कित्येक वर्षे होती. या बेळगाव महापालिकेमध्ये भाजप 36 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 10, अपक्ष 10, म ए समिती 4 आणि एमआयएमने 1 जागा जिंकली आहे. बेळगावमध्ये एकूण 58 वॉर्ड आहेत. (Belgaum Election Result)
बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव
कलबुर्गीकरांची काँग्रेसला साथ... (Kalburgi Election Result)
बेळगावमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी देखील हुबळी-धारवाड या भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. याचबरोबर आणखी एक महापालिका कलबुर्गीमध्ये काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता असून 1 वाजेपर्यंतच्या निकालानुसार काँग्रेस 22, भाजपा 20, जेडीएस 3 आणि अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळविला आहे.