शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

Hubli-Dharwad Election Result: हुबळी-धारवाडमध्ये भाजपाची हॅट्ट्रिक; तिसरी महापालिका काँग्रेसला तारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 2:43 PM

BJP's hat-trick in Hubli-Dharwad: हुबळी धारवाड (Hubballi-Dharwad) महापालिकेत भाजपाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने कडवी टक्कर दिली आहे.

Karnataka municipal election results 2021: बेळगावमध्येभाजपाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वर्चस्वाला सुरुंग लावत महापालिका ताब्यात घेतलेली असताना  हुबळी-धारवाड पालिकाही भाजपाने तिसऱ्यांदा ताब्यात ठेवली आहे. हुबळी धारवाड (Hubballi-Dharwad) महापालिकेत भाजपाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने कडवी टक्कर दिली आहे. (Karnataka municipal election results 2021: two corporation in BJP's control, but have to fight for Kalburgi.)

Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

हुबळी-धारवाड महापालिकेत भाजपा 39 जागांवर आघाडीवर असून आहे. तर काँग्रेस 33 जागांवर, अपक्षांनी 6 जागा, जेडीएस 1 आणि एआयएमआयएमने 3 जागांवर आघाडीवर आहेत. एकूण 82 जागांपैकी 70 जागांचे निकाल आले असून भाजपा 34, काँग्रेस 27, जेडीएस 1, AIMIM 2 व अपक्षांनी 6 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 42 जागांची आवश्यकता आहे. (Hubballi-Dharwad Election Result.)

तर दुसरीकडे भाजपाने बेळगाव महापालिका हिसकावून आणली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ताब्यात ही महापालिका गेले कित्येक वर्षे होती. या बेळगाव महापालिकेमध्ये भाजप 36 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस 10, अपक्ष 10, म ए समिती 4 आणि एमआयएमने 1 जागा जिंकली आहे. बेळगावमध्ये एकूण 58 वॉर्ड आहेत. (Belgaum Election Result)

बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव 

कलबुर्गीकरांची काँग्रेसला साथ... (Kalburgi Election Result)बेळगावमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी देखील हुबळी-धारवाड या भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. याचबरोबर आणखी एक महापालिका कलबुर्गीमध्ये काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता असून 1 वाजेपर्यंतच्या निकालानुसार काँग्रेस 22, भाजपा 20, जेडीएस 3 आणि अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळविला आहे.

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसbelgaonबेळगाव