नवी दिल्ली -बिहार निवडणुकीत भोवऱ्यात अडकलेली नितीश कुमारांची नाव तटाला लावण्यापासून, उत्तर प्रदेश ते नगालँडपर्यंत 10 राज्यांच्या पोट निवडणुकीत भाजपची चकाकी वाढवण्यात पुन्हा एकदा मोदींच्या करिष्म्याने कमाल केली. भाजपच्या या विजयानंतर सोशल मीडियावरही 'मोदीची लाट' आली आहे. ट्विटरवर #PmModiSuperWave ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगच्या माध्यमाने लोक या विजयाचे संपूर्ण श्रेय मोदींना देत आहेत.
येथे एक गोष्ट जाणणे अत्यंत महत्वाचे आहे, की लोक कोरोना व्यवस्थापन आणि लॉकडाउनसंदर्भात मोदींसोबत आहेत? हा प्रश्न यासाठी आवश्यक आहे, की बिहारसह संपूर्ण देशातील काही लोक भाजपच्या विजयामुळे हैराण आहेत. त्यांनी, कोरोनामुळे लोकांना कराव्या लागलेल्या स्थलांतराचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत, बिहारचे लोक या काबीलच आहेत. सुरभी शर्मा आणि अफ्फू यांनी ट्विट करत "प्रिय बिहारी, आपण सर्व यास पात्र आहात," असे म्हटले आहे.
बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट
बिरहारमध्ये दिसला भाजपचा दम...भाजपने बिहारमध्ये 66.4 टक्के स्ट्राइक रेटने 74 जागा जिंकल्या आहेत. तर आरजेडीने 75 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, आरजेडीने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, त्यांचा स्ट्राइकरेट भाजपपेक्षा तब्बल 14 टक्के कमी म्हणजे 52.8 टक्के एवढा आहे. तर एनडीएतील जेडीयूचा स्ट्राइक रेट केवळ 37.4 टक्के एवढाच आहे. त्यांनी 43 जागा जिंकल्या आहेत.
10 राज्यांत पोट निवडणुका, 67% जागांवर भाजपचा कब्जा -केवळ बिहारमध्येच नाही, तर बिहार व्यतिरिक्त इतरही 10 राज्यांतील 59 विधानसभा जागांपैकी 40 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. अर्थात त्यांना जवळपास 67.79% जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने मध्य प्रदेशात 28 पैकी 19, उत्तर प्रदेशात 7 जागांपैकी 6 आणि गुजरातमधील सर्वच्या सर्व 8 जागांवर विजय मिळवला असेल. एवढेच नाही, तर कर्नाटकात भाजपने 2 पैकी 2 तर मणिपूरमध्ये 5 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत.
Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?
मोदी एकटेच गेमचेन्जर!पंतप्रधान मोदी हे देशाचे एकटे गेमचेन्जर आहेत, असे राम अहिर यांनी म्हटले आहे, त्यांनी लिहिले आहे, की 'पीएम मोदी हे एकमेव गेमचेन्जर आहेत.'
'आणखी दिसत राहणार मोदी लाट'तुफान करन यांनी दावा केला, की येणारी काही वर्षे अशाच प्रकारची मोदी लाट पाहायला मिळेल. '18 वर्ष आणि काउंटिंग. भूतकाळातील कोणताही राष्ट्रीय नेता एवढ्या दीर्घकाळ लोकप्रिय राहिलेला नाही. चांगली गोष्ट, ही की असे आणखी अनेक वर्षे जाणार आहेत.
मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा
लॉकडाउन काळातील त्रास का विसरले मतदार? बिहारमध्ये झालेल्या एनडीए विजयामुळे विरोधक अत्यंत दुःखी आहेत. येथील मतदार लॉकडाउन काळातील त्रास एवढ्या लवकर आणि एवढ्या सहजपणे कसे विसरले? हेच त्यांना कळेनासे झाले आहे. पण खरेतर, मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या ऐतिहासिक कामांचीच ही फलश्रृती आहे, असे म्हणावे लागेल. या काळात मोदींनी केलेली अशी काही ऐतिहासिक कामे आहेत, ज्यांच्यापुढे लोकांचा झालेला लॉकडाउनचा त्रासही तोटका पडला. ही कामे लोकांसाठी अत्यंत सरस आणि महत्वाची ठरली. मोदींनी कोट्यवधी गरिबांना उघडून दिलेली जनधन खाती, सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच कोरोना काळात गरिबांना मोफत धान्य पुरवणे, अशा अनेक कामांचा जनतेवर मोठा परिणाम झाला.