लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड

By बाळकृष्ण परब | Published: October 27, 2020 07:50 AM2020-10-27T07:50:41+5:302020-10-27T07:53:02+5:30

BJP News : लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

BJP wins 15 seats in Ladakh Autonomous Hill Development Council election | लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड

लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड

Next
ठळक मुद्देएकूण २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवला काँग्रेसला ९ आणि अपक्षांना दोन जागांवर समाधान मानावे लागलेया निवडणुकीत एकूण ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता

लेह - सहाव्या लडाख पर्वतीय विकास परिषद लेह निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. एकूण २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद यश प्राप्त केले आहे. तर काँग्रेसला ९ आणि अपक्षांना दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी या निवडणुकीवर अनेक पक्षांनी बहिष्कार घातला होता. मात्र नंतर एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि नंतर निवडणुकीचा मार्ग मोकळाझाला होता.

पर्वतीय परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांचा ईव्हीएमचा वापर झाला. तसेच २३ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. एकूण ५४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने सर्वा २६ जागांवर उमेदवार उतरवले होते. तर आम आदमी पक्षाने १९ उमेदवार दिले होते. तसेच २३ अपक्ष उमेदवारसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. 



दरम्यान, या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षावर विश्वास दर्शवल्याबद्दल लडाखमधील जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. भाजपा नेते राम माधव यांनीही या विजयासाठी भाजपाच्या लडाखमधील पथकाचे अभिनंदन केले आहे.

कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यानंतर या भागात पहिल्यांदाच लेह विकास परिषदेची निवडणूक होत होती. त्यामुळे भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. २०१५ मध्ये झालेल्या या परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला २६ पैकी १८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी भाजपाला सत्ता मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Web Title: BJP wins 15 seats in Ladakh Autonomous Hill Development Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.