BJP Leader Deepika Patel Commits Suicide :सूरत : गुजरातमधीलसूरतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरत शहरातील अलथाना वार्ड क्रमांक ३० मधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुजरातच्या ३४ वर्षीय भाजप महिला नेत्या दीपिका पटेल यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, दीपिका पटेल यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच, दीपिका पटेल यांच्या नातेवाईकांनी फॉरेन्सिक पोस्टमार्टमची मागणी केली आहे. दीपिका पटेल यांची आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दीपिका पटेल यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
दीपिका पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तर दीपिका पटेल यांच्या नातेवाईकाने सांगितले की, दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्ता होत्या. त्या समाजसेवा करत होत्या. यादरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची हत्या होण्याची भीती होती. ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी त्यांची मुलं घरात होती. तर त्यांचे पती शेतात होते.
दीपिका पटेल आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबतची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतर समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.