जयपूर (राजस्थान) : पंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. या निवडणुकीसोबत जिल्हा परिषदेच्या ६३६ जागांसाठीही निवडणूक झाली. सत्ताधारी काँग्रेसने १० तर भाजपने ३ जागा जिंकल्या. मतमोजणी अजूनही सुरू आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. जिल्हा परिषदेच्या १,७७८ उमेदवारांचे व पंचायत समित्यांतील १२ हजार ६६३ उमेदवारांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे. मतदान २३ व २७ नोव्हेंबर व एक व पाच डिसेंबर रोजी झाले.
राजस्थान पंचायत समिती निवडणूक : भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 5:56 AM