नवी दिल्ली - १४ राज्यांतील ४८ विधानसभा जागांसाठी झालेल्या पाेटनिवडणुकीत सर्वाधिक २० जागा जिंकत भाजपने आघाडी मिळवली असून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मात देत राजस्थानातही आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसने ७ जागा मिळवल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील ९, राजस्थान-७, प. बंगाल-६, आसाम-५, पंजाब-४, बिहार-४, कर्नाटक-३, केरळ-३, मध्य प्रदेश-२ तर छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेसाठी ही मतमोजणी झाली. उत्तर प्रदेशात भाजपप्रणित रालोआ ७ जागा जिंकल्या आहेत. राजस्थानात ७ पैकी ५ जागा जिंकून राज्यात आपली शक्ती सिद्ध केली.
कर्नाटकात काँग्रेस, बंगालमध्ये तृणमूल
कर्नाटकात काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत तिन्ही जागा पटकावल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचा राज्यातील प्रभाव कायम असल्याचे दाखवत सर्व ६ जागांवर विजय मिळवला. यातील मदारीहाट जागा पूर्वी भाजपकडे होती. तर पंजाबमध्ये ‘आप’ने ४ पैकी तीन जागा जिंकत आपली पकड अधिक मजबूत केली.
सपा-काॅंग्रेसचे गड भेदण्यात भाजपला यश
या १४ राज्यांत भाजपने सर्वाधिक २० जागा पटकावून मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि राजस्थानात काॅंग्रेसचा गड भेदण्यात भाजपला यश मिळाले. या पाेट निवडणुकांत भाजप्रणित ‘रालोआ’ला २३ जागांवर विजय मिळाला.
राज्यनिहाय निकालउत्तर प्रदेश : भाजप-६, रालोद-१, सपा-२.राजस्थान : भाजप-५, काँग्रेस-१, इतर-१.बिहार : भाजप-२, जदयू-१, इतर-१प. बंगाल : तृणमूल काँग्रेस -६पंजाब : आप -३, काँग्रेस - १मध्य प्रदेश : भाजप-१, काँग्रेस-१आसाम : आसम गण परिषद-१, भाजप-३, यूपीपीएल-१कर्नाटक : काँग्रेस-३केरळ : काँग्रेस -१, माकप-१उत्तराखंड : भाजप -१गुजरात : भाजप-१छत्तीसगड : भाजप-१सिक्कीम : एसकेएम-२मेघालय : एनपीपी -१