काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. सध्या ही यात्रा राजस्थानमध्ये पोहोचली आहे. राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला शेवटचे काही दिवस उरले आहेत. यानंतर ही यात्रा दिल्ली आणि हरियाणाकडे रवाना होईल. राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली. दौसा, सचिन पायलट यांच्या परिसरात ही यात्रा पोहोचली, यावेळी राहुल गांधी यांची यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. रस्त्यावरील मोठी गर्दीबरोबरच आजूबाजूच्या घरांच्या छतावरही लोक उभे होते.यावेळी भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते, या संदर्भात एक व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे.
भारताच्या राशीला चिनी ग्रह; काही घडलेच तर अमेरिका स्वस्थ बसणार नाही
दरम्यान, राहुल गांधींची यात्रा दौसा येथील भाजप कार्यालयाबाहेरही गेली, तेथे अनेकजण राहुल गांधींना ओवाळताना दिसले. भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधींचे चाहते झाल्याचा दावा काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी दोन्हीकडून दोघांनी मिळून जय सियारामच्या घोषणा दिल्या.
काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये दौसा येथील भाजप कार्यालयाच्या छतावर अनेकजण जमले आहेत. जेव्हा यात्रा त्यांच्या कार्यालयाबाहेरून जाते तेव्हा राहुल गांधी त्यांना सोबत येण्याचे आवाहन करतात.यावेळी राहुल गांधी जय सियारामचे नारेही देताना दिसत आहेत. यावेळी भाजप कार्यालयाच्या छतावर उभ्या असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी राहुल गांधी यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. राहुल गांधींनीही यापूर्वी मध्य प्रदेशात जय सियाराम आणि जय श्री राम यातील फरक सांगितला होता.
'ते 'जय श्री राम' म्हणतात, 'जय सिया राम' नाही कारण ते माँ सीतेची पूजा करत नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हटले होते. 'जय सिया राम' किंवा 'जय सीता राम' म्हणजे राम आणि सीता एकच आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.