शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
3
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
4
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
5
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
6
पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?
7
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
8
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
9
तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?
10
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
11
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
12
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
13
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
14
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
15
Bhaubeej 2024 : रिंकू राजगुरूने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो
16
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
17
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
18
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
19
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
20
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?

'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 6:08 PM

पक्षाकडून ठाकूर यांना कठोर शब्दांत समज

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्यानं भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर अडचणीत आल्या आहेत. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्या विधानावर नेतृत्त्व पक्ष नाराज असल्याचं नड्डा यांनी ठाकूर यांना सुनावलं. यासाठी ठाकूर यांना दिल्लीतील मुख्यालयात बोलावण्यात आलं होतं. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना ठाकूर यांनी मोदींच्या 'स्वच्छ भारत' योजनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरुन पक्षानं ठाकूर यांना कठोर शब्दांमध्ये समज दिली. पक्षाच्या योजना आणि विचारधारा यांच्याविरोधात जाणारी विधानं करू नका, अशी सूचना नेतृत्त्वाकडून त्यांना करण्यात आली. ठाकूर २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचं विधान ठाकूर यांनी केलं होतं. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली. ठाकूर यांनी त्यांच्या विधानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगली. 'आम्ही गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू', असं ठाकूर म्हणाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकूर यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असं त्या म्हणाल्या होत्या. २६/११ हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापानं मरण पावले, असंदेखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणलं होतं. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाNathuram Godseनथुराम गोडसेMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNarendra Modiनरेंद्र मोदी