अहमदाबाद : निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील जाहिरातींत ‘पप्पू’ शब्द वापरण्यास मनाई केल्यानंतर भाजपने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी ‘युवराज’ हा शब्द वापरला आहे.जाहिरातीचा हा ताजा व्हिडिओ आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी गुजरात भाजपच्या फेसबुक पेजवर प्रसारित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ज्या जाहिरातीत ‘पप्पू’ हा शब्द वापरायला भाजपला मनाई केली ती हीच जाहिरात आहे का, असे विचारता भाजपचे प्रवक्ते हर्षद पटेल म्हणाले की, प्रसारित झालेली जाहिरात तीच आहे की वेगळी, याची मला कल्पना नाही. राहुल गांधी यांची समाजमाध्यमांत टर उडवण्यासाठी ‘पप्पू’ शब्द वापरला जातो, तर भाजपचे नेते नेहमीच राहुल गांधी यांना ‘युवराज’ किंवा ‘शहजादा’ या शब्दांत टोमणे मारत असतात. ४९ सेकंदांच्या या व्हिडिओतील आवाज म्हणतो की, सर, सर... त्याला प्रतिसाद म्हणून दुकानमालकाचा सहायक म्हणतो ‘युवराज आले आहेत.’ युवराज या शब्दाला उत्तर देताना दुकानदार म्हणतो की, तो त्यांना कोणतेही किराणा सामान देईल; परंतु मते देणार नाहीत.
भाजपाच्या जाहिरातीत ‘पप्पू’ऐवजी ‘युवराज’, भाजपाच्या पेजवर व्हिडिओ प्रसारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:11 AM