शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

भाजपची नवी टोपी! गुजरात, हिमाचलमध्ये ‘आप’ला नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 2:40 AM

आपच्या झाडू चिन्हाच्या टोपीचा मुकाबला करण्यासाठी नव्या डिझाइनची टोपी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

हरीश गुप्ता नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीला नियंत्रणात ठेवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पंजाबमधील विजयानंतर आपमध्ये उत्साह आहे. कारण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल देशातील शहरी भागात लोकप्रिय होत आहे. विधानसभा निवडणुका होणाऱ्या या दोन राज्यात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपला काँग्रेसपेक्षाही आपच्या वाढत्या दबदब्याची काळजी आहे. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने हे मान्य केले की, पंजाबच्या ग्रामीण भागात काँग्रेसविरोधी मते मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे झाले नाही. 

काय आहे राजकारण?

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहक्षेत्र आहे. तर, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशातील आहेत. काँग्रेसविरोधी मते मिळविण्यासाठी आणि या राज्यात विस्ताराचा आपचा प्रयत्न निष्फळ करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे.अलीकडेच, जे. पी. नड्डा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशात आपमध्ये फूट पाडली. आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि अन्य नेत्यांचे पक्षात स्वागत करण्यासाठी ते अर्ध्या रात्री शिमला येथे गेले. 

असाच प्रयत्न गुजरातमध्येही सुरू आहे. भाजप आपल्या निवडणूक अभियानात बदल करत आहे. आपच्या झाडू चिन्हाच्या टोपीचा मुकाबला करण्यासाठी नव्या डिझाइनची टोपी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी स्वत: भाजपची नवी टोपी परिधान केली होती. या राज्यात भाजप आता काँग्रेस नेत्यांनाही भुरळ घालत आहे.