कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते बीएस येडीयुराप्पा यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका १७ वर्षांच्या मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
येडीयुराप्पा यांच्याकडे फसवणुकीच्या एका प्रकरणात एक महिला आणि तिची १७ वर्षांची मुलगी मदत मागण्यासाठी आली होती. यावेळी येडीयुराप्पा यांनी या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. २ फेब्रुवारीचा हा प्रकार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
येडीयुराप्पा यांच्याविरोधात बंगळुरुच्या सदाशिवनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळीच हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोक्सो (लैंगिक अत्याचार) कलम 8 आणि कलम 354 ए (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
येडीयुराप्पांवर गुन्हा दाखल होताच कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्याशी चर्चा करून आयुक्त माघारी निघाले आहेत.
येडीयुराप्पांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया...
बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या महिलेने आजपर्यंत दाखल केलेल्या 53 प्रकरणांची यादी जारी केली आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने तक्रारदार महिलेला अशा तक्रारी दाखल करण्याची सवय असल्याकडे लक्ष वेधले आहे.