बंगळुरु - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकात भाजप आमदार के जी बोपय्या यांच्या नावाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. उद्या फ्लोअर टेस्टही बोपय्याचं घेणार आहे. यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. बोपय्या गेल्या वेळी भाजपा सरकारमध्ये कर्नाटक विधानसभा अध्यक्ष होते. सध्या ते विराजपेठ मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत. के जी बोपय्या यांच्या निवडीनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. तर भाजपाकडूनही प्रतिउत्तर देण्यात आले.
कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेस नेत्यांनी के जी बोपय्या यांच्या निवडीवर म्हटलं. भाजपने जे केलंय ते नियमबाह्य आहे, सर्वसाधारणपणे सर्वात वरिष्ठ नेत्याला हे पद दिलं जातं असे मत काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केले. तर या मुद्द्यावरही आमच्यापुढचे सगळे मार्ग खुले आहेत. परंतु, या मुद्यावर आम्ही कोर्टात कधी जाऊ ते आत्ताच सांगता येणार नाही' असं बोपय्या यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ आमदारांऐवजी के.जी. बोपय्यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून राज्यपाल वजुभाई वाला यांनी पुन्हा एकवार घटनेचं 'एन्काउन्टर' केला असल्याचे मत काँग्रेसचे रणदीप सुरजेरवाला यांनी व्यक्त केली. के. जी. बोपय्यांना 2008 मध्ये देखील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनवलं होतं. त्यावेळी बोपय्यांचं वय आजच्यापेक्षा 10 वर्षांनी कमी होतं. काँग्रेस विनाकारण विरोध करत आहे. बोपय्यांची नियुक्ती नियमांनुसार असल्याची प्रतिक्रीया प्रकाश जावडेकर यांनी दिली.