शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 5:26 PM

Assembly Bye Election Result 2024: नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटत नाही तोच सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीचे सगळे  निकाल आज जाहीर झाले असून, त्यात केवळ २ ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं. हे नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटत नाही तोच सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीचे सगळे  निकाल आज जाहीर झाले असून, त्यात केवळ २ ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला. तर काँग्रेसने ४ आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी ६ मतदारसंघात विजय मिळवला.

निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक झालेल्या तेराही मतदारसंघामधील निकाल जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये पोटनिवडणूक झालेल्या तीन पैकी दोन मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे. हिमाचल प्रदेशमधील देहरा मतदारसंघातून काँग्रेसच्या कमलेश ठाकूर ह्या विजयी झाल्या आहेत. तर नलगड मतदारसंघातून काँग्रेसचे हरदीप सिंह बावा हे विजयी झाले आहेत. मात्र हमीरपूर मतदारसंघात भाजपाच्या आशिष शर्मा यांनी विजय मिळवला.

इतर राज्यांपैकी मध्य प्रदेशमधील अमरवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश प्रताप सिंह यांनी विजय मिळवला. तर पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी बाजी मारली. तामिळनाडूमध्ये विक्रावंडी मतदारसंघातून डीएमकेच्या ए. शिवा यांनी विजय मिळवला. उत्तराखंडमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. येथे बद्रिनाथ मतदारसंघात काँग्रेसचे लखपत सिंह बुटोला विजयी झाले. तर मंगलोर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे काझी मोहम्मद निजामुद्दीन विजयी झाले. 

पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या ४ जागांसाठी मतदान झालं. त्यामध्ये चारही जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. राणीगंजमध्ये तृणमुलचे उमेदवार कृष्णा कल्याणी, राणीघाट दक्षिण मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे मुकुट मणी अधिकारी, बागदा मतदारसंघात तृणमूलच्या मधुपर्णा ठाकूर आणि मणिकटला मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या सृप्ती पांडे ह्या विजयी झाल्या. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी