शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

भाजपाची पहिली यादी फायनल! प्रज्ञा ठाकुर यांच्या जागी शिवराज; 100 उमेदवार जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:53 IST

BJP Loksabha candidate First List Final: पहिल्या यादीतच मोदी-शाह धक्कातंत्र देण्याच्या तयारीत. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक-दोन दिवसांत येऊ शकते.

भाजपानेलोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीसाठी गुरुवारी रात्री मुख्यालयामध्ये मॅरेथॉन बैठक घेतली होती. या बैठकीला त्या त्या राज्यांचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय स्तरावरील नेते पहाटे साडे तीनपर्यंत उपस्थित होते. या बैठकीत भाजपाने १०० उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली आहे. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक-दोन दिवसांत येऊ शकते. या यादीत अनेक शॉकिंग बदल केले जाण्याची शक्यता आहे. 

या यादीमध्ये पीएम मोदी (वाराणसी), गृहमंत्री अमित शहा (गांधीनगर), राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्यासह बड्या नेत्यांची नावे असणार आहेत. तसेच 2019 मध्ये भाजपने कमी फरकाने गमावलेल्या किंवा जिंकलेल्या 'कमकुवत' जागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम, तेलंगणा, केरळ आदी राज्यांचा समावेश होता. या यादीमध्ये भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य शिंदे, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, सर्बानंद सोनोवाल, व्ही मुरलीधरन यांचा समावेश आहे.

याचबरोबर विद्यमान खासदारांना ज्यांची कामगिरी चांगली नाहीय त्यांना डच्चू देऊन नवीन उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भाजपाच्या खासदारांच्या जागा धोक्यात आहेत. यामुळे सातपैकी कमीतकमी तीन खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच बंगालमध्ये आसनसोलमधून तृणमूल खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यविरोधात भोजपुरी स्टार पवन सिंह याला उतरविले जाण्याची शक्यता आहे. 

तामिळनाडूमध्ये भाजपा अध्यक्ष अन्नामलाईंवर डाव खेळला जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भोपाळमधून रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. या जागेवर वादग्रस्त साध्वी प्रज्ञा सिंह या खासदार आहेत. त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूर