शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

विधानसभा निवडणुकीसाठी BJPची पहिली यादी; मध्य प्रदेशचे ३९, छत्तीसगडचे २१ उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 4:42 PM

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानेमध्य प्रदेशसाठी ३९ आणि छत्तीसगडसाठी २१ उमेदवार जाहीर केले आहेत. या वर्षीच दोन्ही राज्यात निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पहिली यादी जाहीर करून भाजपाने आपली आक्रमक रणनीती स्पष्ट केली आहे.

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. सीईसी सदस्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या तयारीचाही आढावा घेतला.

विधानसभेच्या ९० जागांवर चर्चेनंतर निर्णय

बैठकीत छत्तीसगडवर चर्चा झाली. यादरम्यान राज्यातील ९० विधानसभा जागांची मालिका चर्चा झाली. सुमारे दोन तास छत्तीसगडबाबत चर्चा झाली. यानंतर मध्य प्रदेशचीही चर्चा झाली. पक्षाच्या हायकमांडचे लक्ष प्रामुख्याने संवेदनशील जागांवर होते.

पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार-

खरे तर देशातील पाच राज्यांमध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. भाजपाची सत्ता फक्त मध्य प्रदेशात आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर तेलंगणात बीआरएसची सत्ता आहे.

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकChhattisgarhछत्तीसगड