ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. १९ - केरळमध्ये अखेर खाते उघडण्यात भाजपला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
हा विजय अशक्यप्राय वाटत होता. त्यांनी सीपीआय (एम)च्या व्ही. सिवानकुटटी यांचा पराभव केला. लोकसभेच्यावेळी केरळमध्ये भाजपची मतांची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे विधानसभेत काही जागा मिळतील असे वाटत होते.
I salute all those who built the BJP in Kerala, brick by brick, decade after decade. It is due to them that we are seeing this day.— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
मतमोजणींच्या प्रारंभीच्या फे-यांमध्ये दहा जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर फक्त एका जागेपर्यंत ही आघाडी मर्यादीत राहिली. राजागोपाल ८३ वर्षांचे आहेत.