सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:22 AM2020-07-15T01:22:50+5:302020-07-15T06:55:22+5:30

राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.

BJP's footsteps for Sachin Pilot; The side that will be presented to the media today | सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

Next

नवी दिल्ली : काँग्रेसकडूनसचिन पायलट यांची दोन पदांवरून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपने त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भाजपचे राजस्थानमधील नेते व खा. पी. पी. चौधरी यांनी म्हटले आहे की, भाजप लोकशाहीवादी पक्ष आहे. ही विचारधारा त्यांना मान्य असेल तर त्यांचे स्वागत आहे. दरम्यान, पायलट समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे डोटासरा यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दली टीकास्त्रही सोडले आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा इतिहास अपमानित करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवून काँग्रेसने प्रत्येक राजस्थानीचा स्वाभिमान दुखावला आहे, असेही ते म्हणाले. भाजपने आपली भूमिका ठरवली असून, योग्यवेळी पावले उचलणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सरकारमधील घटनाक्रमावर पक्षाचे लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या संपर्कात
- पायलट यांनी अद्याप आपले पत्ते उघडले नसले तरी ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. ते उद्या सकाळी १० वाजता माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत.
- तोपर्यंत ते दिल्ली जवळील मानेसरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसच्या १६ व इतर आमदारांशी रणनीती बनवण्यात गुंतले आहेत.
- उद्या माध्यमांसमोर जाण्यापूर्वी ते अमित शहा व नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात, असेही समजते. तोपर्यंत काँग्रेस व अपक्षांचे नेते फोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.

सोनिया गांधी यांनी लिहिली पटकथा
काँग्रेसचे नेते सचिन पायलट, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची पटकथा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या सांगण्यावरुन लिहिली गेली. विश्वेंद्र सिंह, रमेश मीणासह अन्य पायलट समर्थक भाजपसोबत मिळून गेहलोत सरकार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याची एक आॅडिओ आणि एक व्हिडिओ यांची माहिती सोनिया गांधी यांना देण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आॅडियोमध्ये सचिन पायलट यांचा आवाज होता आणि ते राज्यसभा निवडणुकीपूर्वीच गेहलोत सरकारला हटविण्याबाबत बोलत होते.

Web Title: BJP's footsteps for Sachin Pilot; The side that will be presented to the media today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.