भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 05:37 PM2018-11-30T17:37:16+5:302018-11-30T17:39:34+5:30

मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

BJP's former chief minister said, Congress will have win in Madhya Pradesh Election | भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

Next
ठळक मुद्देभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे म्हटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भोपाळ येथून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस आमदार आरिफ अकील बाबूलाल गौर यांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी गौर यांनी हे भाकित केले. संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबूलाल गौर आणि आरिफ अकिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे

भोपाळ - अत्यंत अटीतटीच्या वातावरणात प्रचार झाल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदरांनी विक्रमी मतदानासह EVM मध्ये बंद केले आहे. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे म्हटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

भोपाळ येथून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस आमदार आरिफ अकील बाबूलाल गौर यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी  त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करण्याच्या ओघात बाबूलाल गौर यांना राज्यात काँग्रेसचा विजय होईल, तसेच तुम्ही मंत्री व्हाल, असे सांगून त्यांना शुभेच्छाही दिल्या. 

यावेळी काँग्रेसने माझ्या सुनेला तिकीट मिळवून देण्यासाठी मदत केली, असेही बाबूलाल गौर म्हणाले, तसेच सरताज सिंह यांना तिकीट न दिल्याबद्दल त्यांनी भाजपाबाबत नाराजीही व्यक्त केली. 
दरम्यान, या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबूलाल गौर आणि आरिफ अकिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होते, असे आरिफ अकिल असे म्हणाले. तर बाबूलाल गौर यांना सांगितले की,  जर माझ्या घरी कुणी आले तर त्या मी शाप तर देणार नाही ना? कुणी घरी आलं तर त्याला मिठाईच देईन, विष थोडेच देईन, हे आमचे प्रेम आहे. त्याला राजकारणाशी जोडी नका. 

Web Title: BJP's former chief minister said, Congress will have win in Madhya Pradesh Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.