नितीन अग्रवाल ।
नवी दिल्ली : भविष्यातील रणनीती आणि सरकार आणि संघटनेत समतोल साधत भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपली नवीन टीम तयार करताना नवीन चेहऱ्यांना संधी देताना अनुभवी नेत्यांनाही स्थान दिले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नवीन राष्टÑीय कार्यकारिणीत महाराष्टÑातील आठ नेत्यांचा समावेश आहे.
बारा उपाध्यक्षांत बीजेडीतून आलेले बी. जे. पांडा, तृणमूल काँग्रेसमधून आलेला मुकुल रॉय आणि राजदमधून आलेल्या अन्नपूर्ण देवी यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसमधून आलेल्या डी. पुरंदेश्वरी यांना सरचिटणीस केले आहे. तसेच टॉम वडक्कन यांचाही प्रवक्ते म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावरून भाजपची व्यापक आणि विस्तारवादी मोहीम स्पष्ट होते. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. सरचिटणीस अरुण सिंह आणि संघटन सचिव रविप्रकाश यांच्यासह ७ नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.महाराष्टÑातील ८ नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी...च्जे.पी. नड्डा यांच्या नवीन टीममध्ये महाराष्टÑातील ८ नेते आहेत. सह-संघटन सचिवपदी व्ही. सतीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांना राष्टÑीय सचिवपद देण्यात आले आहे.च्याशिवाय जमाल सिद्दीकी यांच्यावर अल्पसंख्याक मोर्चा राष्टÑीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खासदार डॉ. हिना गावित आणि मुंबईचे संजू वर्मा यांना राष्टÑीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.