हरीश गुप्ता, ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर -
भाजपच्या वतीने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पर्यवेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सध्या पेट्रोलियम आणि नगरविकास आणि गृहनिर्माण कामकाज खात्याचे मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri) यांच्याकडे आहे. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांची घेतलेली मुलाखत.
पंजाबला तुम्ही वारंवार भेट देता. अकाली भाजपपासून दुरावल्यानंतर आता तुमचा पक्ष भाजपचा प्रवास कसा आहे?- ते प्रकरण आता मागे पडले. पंजाबच्या तुकडीचा सदस्य असण्याची जबाबदारी पक्षाने मला आता दिली आहे. भाजप खूपच चांगली कामगिरी करीत असल्याचे मी तुम्हाला सांगू शकतो.तुमचा पक्ष शर्यतीतही नाही, असे सगळ्या मतदान चाचण्या सांगत असताना तुमच्या विधानाचा आधार कोणता?- या मतदान चाचण्या कशा असतात, हे तुम्हाला माहीत आहे. राज्यांमागून राज्यात त्या भरकटल्या आहेत.भाजप किती जागा जिंकणार?- जनतेला बदल हवा आहे. काँग्रेस आत्मघाती मार्गावर आहे. मी भाजपबद्दल बोलतोय. ११७ सदस्यांच्या विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल.तुम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग आणि एस. एस. धिंडसा यांच्यासोबत युती करून ६५ जागा लढवत आहात आणि तुम्ही म्हणता की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल.- अमरिंदर सिंग यांच्या पक्षाच्या ८ उमेदवारांसह आम्ही ७३ जागा भाजपच्या चिन्हावर लढवत आहोत. भाजप हा हिंदूंचा पक्ष असल्याचे समजण्याचे दिवस आणि तो २३ जागांवर मर्यादित राहिल्याचे दिवस आता नाहीत. तुमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल?- शब्दांचा खेळ करणारा मी नाही. आज पंजाब त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल करीत आहे. परंतु, हे दृश्य मोदीजींनी प्रचार सुरू करताच बदलून जाईल. भाजप जागा जिंकणार त्या किती?- आम्हाला पंजाबमध्ये स्वबळावर ३० जागांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०-४५ जागांपर्यंत जाऊ शकेल. निवडणुकीनंतर अकालींसोबत युती होणार नाही?- अजिबात नाही. ४० वर्षांत आम्ही युतीमध्ये विस्तार करण्यात अपयशी ठरलो. आता आम्ही चालकाच्या जागी आहोत.तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?- आमदार ठरवतील आणि पक्षश्रेष्ठी निकालानंतर निर्णय घेतील.तरी तुम्ही किती जागा जिंकणार?- मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, काँग्रेस प्रत्यक्षात प्रभाव गमावणार असून लोकांनी तर अकालींना निरुपयोगी म्हणून टाकून दिले आहे. जमीन, वाळू आणि अमली पदार्थांचे माफियांनी राज्याला नष्ट केले असून, लोक त्या दोघांबद्दलही निराश झाले आहेत. आम आदमी पक्षाबद्दल काही चांगले न बोललेले बरे.