शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
3
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
4
सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
6
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
7
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
8
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
9
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
10
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
11
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
12
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
13
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
14
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
15
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
16
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
17
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
18
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
19
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
20
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!

यंदा ९ विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचे ‘गुजरात मॉडेल’चे संकेत; काय आहे तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:15 AM

एकातही पराभूत व्हायचे नाही : पक्षाध्यक्ष नड्डा यांचे आवाहन

संजय शर्मानवी दिल्ली : भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशीच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  ९ राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले. यातील एकाही निवडणुकीत पराभव पत्करायचा नाही, सर्व निवडणुकांमध्ये विजयाची नोंद करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. गुजरात मॉडेल इतर राज्यांमध्येही लागू केले जाईल, असे संकेतही त्यांनी दिले. 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात विजयाचे अभिनंदन आणि कौतुक करणारा प्रस्तावही कार्यकारिणीत मांडण्यात आला. कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’चे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. 

तीन राज्यात सत्ता राखण्याचे आव्हान त्रिपुरा, कर्नाटक, मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत; तर मेघालय, नागालँडमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सरकारे आहेत. त्रिपुरा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकारे वाचविणे हे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. तेलंगणाबाबत नड्डा म्हणाले, भाजप तेलंगणात संघर्ष करीत आहे; मात्र, निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सर्व काही करेल. 

२०२४ चा मूड गुजरातमध्ये भाजपच्या प्रचंड विजयाचा संदर्भ देत किरेन रिजिजू यांनी आगामी २०२४ च्या लोकसभेसाठी देशातील जनतेचा मूड असल्याचे वर्णन केले. 

काय आहे तयारी?नड्डा यांनी अध्यक्षीय भाषणात ९ राज्यांचे मुख्यमंत्री, २ राज्यांचे उपमुख्यमंत्री, सर्व राष्ट्रीय कार्यकारिणींमध्ये उपस्थित ३५ केंद्रीय मंत्र्यांसह ३५० प्रतिनिधींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची आतापासून तयारी करण्यास सांगितले. २०२४ पर्यंत भाजपला एकाही राज्यात निवडणूक हरायची नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. २०२३ मध्येच त्रिपुरा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे विधानसभा निवडणुका आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा