सामान्य नागरिकांच्या मनात गॅरंटी म्हणताच चार प्रमुख मानदंड उभे राहतात. या चार मानदंडांवर जे सिद्ध होतात, ते गॅरंटीचा आधार बनतात. हे चार मानदंड म्हणजे, नीती, नीयत, नेतृत्व आणि काम करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आम्ही तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. तेलंगानामध्ये भाजपच्या मतांत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे दिसून येते, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सुरत विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे आणि सूरत डायमंड एक्सचेन्जचे अर्थात सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-3 अर्थव्यवस्था बनेल - मोदी म्हणाले, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, गेल्या 10 वर्षांत भारत 10व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकाची आर्थ शक्ती बनला आहे. आता मोदीने, आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप-3 इकोनॉमी माध्ये सहभागी होईल, अशी गॅरंटी देशाला दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे.
सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्ग फुट पेक्षाही अधिक विस्तीर्ण -पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या सूरत डायमंड एक्सचेन्ज अथवा 'सूरत डायमंड बोर्स' जी इमारत आता जगातील सर्वात मोठे ऑफीस बनली आहे. यापूर्वी हा बहुमान पेंटागॉनला होता. सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्ग फुट पेक्षाही अधिक विस्तीर्ण आहे. ही इमारत सूरत शहराजवळील खजोद गावात उभारण्यात आली आहे. सूरत हिऱ्यांच्या उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.