शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

आयएसआयच्या रॅकेटमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य

By admin | Published: February 11, 2017 5:12 AM

मध्यप्रदेश एटीएसने अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करीत आयएसआयच्या कथित ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य ध्रुव सक्सेना

भोपाळ : मध्यप्रदेश एटीएसने अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करीत आयएसआयच्या कथित ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य ध्रुव सक्सेना असल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचे एक छायाचित्रही सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सोबत हा आरोपी व्यासपीठावर दिसून येत आहे. या प्रकारामुळे सत्तारूढ भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्यप्रदेश एटीएसचे प्रमुख संजीव शामी यांनी सांगितले की, जम्मूच्या आरएसपुरा भागातून पोलिसांनी २०१६ मध्ये आयएसआयच्या दोन एजंटांना अटक केली होती. पाकिस्तानातील त्यांच्या म्होरक्यांसाठी ते माहिती पाठवीत होते. या दोन जणांकडून चौकशीत असे आढळून आले की, या कामासाठी सतना निवासी बलराम नावाच्या एका व्यक्तीकडून पैसे मिळत होते. त्यानंतर एटीएसने सतना येथून बलराम यास अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अन्य दहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे दहा जण देशाच्या विविध भागांतून सीमचे आदान-प्रदान करीत होते. या चौकशीतून असे दिसून आले आहे की, आयएसआयसाठी काम करणाऱ्या बलरामची अनेक बँक खाती आहेत. हवालाच्या माध्यमातून यात पैसा येत होता. हवालामार्फत मिळालेला हा पैसा बलराम अन्य सदस्यांना पाठवीत होता. बलरामला सतना येथून अटक करण्यात आल्यानंतर जबलपूरमधून दोन, भोपाळमधून तीन आणि ग्वालियरमधून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएसचे असे म्हणणे आहे की, भारतीय टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीशिवाय अवैध एक्स्चेंज करणे शक्य नाही. दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन करीत आयएसआयच्या विरोधात घोषणाबाजी केली, तर भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.