शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

पनवेलमध्ये फुलले भाजपाचे कमळ

By admin | Published: September 26, 2014 11:11 PM

शुक्रवारी भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

पनवेल : शुक्रवारी भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी डोक्यात टोप्या, गळ्यात कमळाचे चिन्ह असलेला पंचा आणि आणि हातात झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना पनवेलचे रस्ते फुलून गेले. ठाकूर यांनी या निमित्ताने प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत शेकाप या प्रमुख विरोधी पक्षाला एक प्रकारे आव्हान दिले.तालुक्यातून सहाआसनी, चारचाकी, दुचाकी वाहने भाजपाचे झेंडे लावून पनवेलकडे कूच करीत होते. जिकडे तिकडे कार्यकर्ते आणि झेंडे दिसत होते. सकाळी महात्मा गांधी मार्गावरुन मिरवणुकीला सुरुवात झाली ती टपाल नाका मार्गे शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ती बाजारपेठेतून प्रांत कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. यावेळी पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली तसेच ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ठाकूर यांना पाठिंबा दिला. त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील, वाय. टी. देशमुख, मुस्तफा बेग, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रशांत ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे दाखल केला. या व्यतिरिक्त अ‍ॅड. आर. के. पाटील यांनीही अपक्ष म्हणून अर्ज सादर केला. शुक्रवारपर्यंत १६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.