शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भाजपाची बिहारसाठी मेगाऑफर, टीव्ही, लॅपटॉपचे गाजर

By admin | Published: October 01, 2015 2:39 PM

दलित, महादलितांना टीव्ही, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मधेशी समाजातील मुलींना स्कूटी, गरीबांना वर्षाला दोन साडी व धोतर देण्याचे गाजर बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये दाखवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - दलित, महादलितांना टीव्ही, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मधेशी समाजातील मुलींना स्कूटी, गरीबांना वर्षाला दोन साडी व धोतर देण्याचे गाजर बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये दाखवण्यात आले आहे. मेक इन बिहार व डिजिटल बिहारचा नाराही भाजपाने दिला आहे.

१२ ऑक्टोबरपासून बिहारमध्ये पाच टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत व्हिजन डॉक्यूमेंटचे प्रकाशन करण्यात आले. बिहारला आर्थिक गरीबीतून बाहेर काढण्याचा आमचा संकल्प असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याप्रसंगी सांगितले. बिहारमध्ये संधीसाधूंची आघाडी असून त्यांच्या राजकीय स्थिरता नाही. अशा लोकांना संधी दिल्यास बिहार आणखी मागे जाईल असे सांगत जेटलींनी विरोधकांवर निशाणा साधला. गुजरात दंगलीवरुन लालूप्रसाद यादव यांनी अमित शहांवर तिखट शब्दात टीका केली होती. यावरही अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले.लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना गोध्रा प्रकरणात समिती नेमून खोटा अहवाल तयार करण्यात आला होता. अमित शहा यांच्याविरोधातही खोटे गुन्हे दाखल झाले होते. पण कोर्टाने अमित शहांविरोधात पुरावा नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली होती याकडेही अरुण जेटलींनी लक्ष वेधले. ६८ वर्षानंतरही बिहारच्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमधील महत्त्वाच्या घोषणा

> शहरात शुद्ध व पथदिवे लावणार 
>  मेधावी समाजाच्या विद्यार्थिनींना स्कूटी
> विद्यार्थ्यांना लॅपटॉप 
> गरीबांना दरवर्षी दोन साड्या व धोतर 
> डिजिटल बिहार व मेक इन बिहारचा नारा
> शहरातील रिक्त जागांवर दुकान बांधून तरुणांना देणार, यातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न