ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 15 - भारतीय जनता पार्टी सध्या मिशन ओडिशामध्ये व्यस्त आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ओडिशातील भुवनेश्वर येथे दाखल झाले आहेत. येथे दाखल होताच पंतप्रधान मोदी थेट राजभवनात पोहोचले. यादरम्यान पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यावेळी मोदींचा भव्यदिव्य रोड शोदेखील पार पडला. देशाच्या पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी याठिकाणी जमा झाली होती. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनीही धोका पत्करुन गाडीतून बाहेर येत लोकांनी प्रेमाने केलेले स्वागत स्वीकारले.
शनिवारपासून भुवनेश्वर येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पार्टीतील अनेक दिग्गज नेते याठिकाणी दाखल झाले आहेत.
ओडिशासहीत कोरोमंडल क्षेत्रात पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी या बैठकीत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अमित शाह म्हणाले की, "लोकं म्हणतात की भाजपासाठी हा सुवर्णक्षण आहे. मात्र केरळ, प.बंगाल आणि ओडिशा अन्य राज्यांमध्ये जेव्हा भाजपाचं सरकार येईल तेव्हा भाजपासाठी सुवर्णक्षण असेल."
Odisha: PM Modi waves at supporters as he proceeds towards the venue of BJP National Executive Meet in Bhubaneshwar. pic.twitter.com/oeVnkHsNjR— ANI (@ANI_news) April 15, 2017
Bhubaneshwar: BJP Pres Amit Shah receives PM Modi at BJP national Exec Meet venue; inside visuals of the meeting pic.twitter.com/qhS0jl76bV— ANI (@ANI_news) April 15, 2017
#WATCH Live : PM Modi in Bhubaneswar, Odisha https://t.co/Ae2CSh9xTL— ANI (@ANI_news) April 15, 2017
Odisha: PM Narendra Modi and senior BJP Leader LK Advani at BJP"s National Executive meet in Bhubaneshwar pic.twitter.com/66qM4ka6Xo— ANI (@ANI_news) April 15, 2017