कोलकाता : गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाना साधला. ट्विटरवर ममता बॅनर्जी म्हणाल्या, गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! हा विजय तात्पुरता आणि कसाबसा मिळविलेला असून हा भाजपाचा नैतिक पराभवच आहे. गुजरातच्या जनतेने दडपशाही, अस्थिरता आणि सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मतदान केले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली. याचबरोबर, गुजरातच्या मतदारांनी 2019 च्या निवडणुकीसाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
गुजरातमध्ये भाजपाचा नैतिक पराभवच - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 8:10 PM
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाना साधला.
ठळक मुद्देसहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिलाभाजपाचा नैतिक पराभवच आहे