शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

श्रीराम मूर्तीच्या विटंबनेविरोधात भाजपाचा मोर्चाचा प्रयत्न; नेत्यांना अटक

By पूनम अपराज | Published: January 05, 2021 7:36 PM

Crime News : यावर पोलिसांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली.

ठळक मुद्दे२८ डिसेंबर रोजी विजयनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्वतीय मंदिरातील भगवान श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली आहे.

गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशातील रामतीर्थम मंदिरात भगवान राम यांचा मूर्तीची विटंबना केल्याच्याविरोधात भाजपा नेत्यांनी मार्च काढण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिसांनीभाजपाचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली.२८ डिसेंबर रोजी विजयनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्वतीय मंदिरातील भगवान श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजप आणि जन सेनेने या घटनेविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. विशेषतः पोलिसांनी यापूर्वी या भेटीस परवानगी दिली होती, परंतु नंतर ती मागे घेण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, यापूर्वी या मोर्च्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु नंतर पोलीस कायद्याच्या कलम 30 अंतर्गत प्रतिबंधात्मक अंमलबजावणीमुळे परवानगी मागे घेण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, निषेधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष व अन्य नेत्यांना अटक केली. भाजपाने असे म्हटले आहे की, त्यांच्या बऱ्याच नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. रामतीर्थम भागात तणाव कायम होता. या वेळी पोलिसांनी भाजपाच्या महिला नेत्या यशस्विनीला कथित बेदम मारहाण केली, त्यानंतर ती खाली पडली असा आरोप आहे. दुसरीकडे राज्य विधानपरिषद सदस्य वीराराजी यांनी या घटनेवरील पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.गेल्या आठवड्यात पोलिसांनी वायएसआर काँग्रेसचे खासदार विजय साई रेड्डी आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांना मंदिरात येण्याची परवानगी दिली असता भाजप आणि जन सेनेच्या नेत्यांना आता कोणत्या कारणास्तव रोखण्यात आले आहे, असा सवाल वीरराजूंनी केला. दरम्यान, विशाखापट्टणममध्ये राज्यसभा सदस्य सीएम रमेश आणि माजी मंत्री के. श्रीनिवास यांना शहर भाजप कार्यालयातून बाहेर येण्याची परवानगी पोलिसांनी दिली नाही. त्यांना मार्चसाठी रामतीर्थम येण्यास रोखण्याच्या भाग म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले.

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. के. लक्ष्मीनारायण आणि माजी आमदार पी विष्णुकुमार राजू यांना नजरकैदेत ठेवले असल्याचा भाजपा नेत्यांचा दावा आहे. यासह अन्य अनेक ठिकाणी भाजपा आणि जन सेनेच्या नेत्यांना रामतीर्थपुरममध्ये जाण्यास प्रतिबंधित केले आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस एस. विष्णुवर्धन रेड्डी म्हणाले की, राज्यात पोलिसांच्या या कारवाईविरोधात ते केंद्राकडे तक्रार करतील. राज्यात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला. श्रीरामाची ती मूर्ती सुमारे ४०० वर्ष जुना होता, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेशArrestअटकTempleमंदिर