- जयशंकर गुप्त, नवी दिल्लीभाजपाचे राष्ट्रीय मुखपत्र ‘कमल संदेश’ला टाळे लागले आहे. यामागे आर्थिक चणचण हे कारण नसून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मर्जीनुसार ते बंद करण्यात आल्याचे कळते. भाजपाच्या विविध कार्ययोजनांसोबत संघटनात्मक निर्णय आणि विविध मुद्यांवर पक्षाची भूमिका पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘कमल संदेश’द्वारे होत होते.भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत ३ जुलैला येथे झालेल्या भाजपाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित शहा यांनी ‘कमल संदेश’ सुरू ठेवण्याच्या औचित्यावर प्रश्नचिन्ह लावत, ते बंद करण्याची निर्णय जाहीर केला. भाजपा उपाध्यक्ष प्रभात झा यांच्याकडे ‘कमल संदेश’च्या संपादनाची जबाबदारी होती. सध्या झा यांच्याकडे चंदीगडचा प्रभार आहे. त्यांनी ‘कमल संदेश’ला नवा आकार देत अल्पावधीत ते लोकप्रिय केले होते. भाजपा सूत्रांच्या मते, ‘कमल संदेश’ बंद करण्याच्या निर्णयामागे प्रभात झा यांचे ‘महत्त्व’ कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. अशाच प्रकारच्या नियतकालिकांचे प्रकाशन भाजपाच्या प्रदेश शाखा करीत असताना राष्ट्रीय स्तरावर ‘कमल संदेश’च्या प्रकाशनाची गरज काय? असा युक्तिवाद अमित शहा यांनी या निर्णयावेळी समोर केला होता. प्रत्यक्षात त्यांचा हा युक्तिवाद पक्षातील अनेकांच्या गळी उतरलेला नाही. पण नरेंद्र मोदींच्या आतील गोटातले २५आणि आपल्या वेगळ्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहांच्या निर्णयाला आव्हान देण्याचे बळ कुणातही नाही.आता नवी व्यवस्था‘कमल संदेश’चे प्रकाशन बंद केल्यानंतर आता एक नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयी डिझाईन केलेली पाच पृष्ठे दर महिन्याला प्रदेश भाजपाच्या मुखपत्रांकडे पाठवण्यात येतील. ही पृष्ठे प्रकाशित करणे बंधनकारक असेल. या पाच पानांवरील मजकूर व संपादनाची जबाबदारी चार जणांच्या एका टीमवर सोपवण्यात आली आहे. या पाच पानांवर पक्षनेते व कार्यकर्त्यांना प्रेरित करणाऱ्या पक्षातील दोन महापुरुषांच्या जीवनाशी संबंधित अनुभव व घटनांचा समावेश असेल.या टीममध्ये प्रभात झा यांच्यासह ‘कमल संदेश’साठी काम केलेले शिवशक्ती तसेच मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलय्या यांच्या पत्नी सुधा मलय्या यांचा समावेश आहे.---
भाजपचे मुखपत्र ‘कमल संदेश’ बंद
By admin | Published: July 18, 2015 3:22 AM