नवी दिल्ली - उत्तर प्रदेश येथील उन्नाव जिल्ह्यात सामूहिक बलात्कारातील पीडितेला जाळून मारल्याने एकाच खळबळ माजली आहे. संपूर्ण देश या घटनेने ढवळून निघाला असताना भाजपच्या खासदाराने ट्विटरवर उन्नावमधील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भाजपच्या निलंबित आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने टीकेची झोड उडाली आहे. या खासदाराचे नाव साक्षी महाराज असं आहे. साक्षी महाराज यांनी केलेले हे ट्विट वायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आले आहे.उन्नाव मतदारसंघातून जिंकून आलेले भाजपचे खासदार आणि वाचाळ नेते साक्षी महाराज यांनी आज उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांना भेटले. त्यानंतर त्यांनी मी माझ्या पक्षासह पीडितेच्या कुटूंबासोबत आहे. मी संसदेतही याबद्दल बोललो होतो. दोषींना अटक केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही असे प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केले. एकीकडे साक्षी महाराज यांनी बलात्कार पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. तर दुसरीकडे बलात्कारातील आरोपीला त्यांनी सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे साक्षी महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, अशी माहिती एनडीटीव्हीच्या न्यूज वेबपोर्टलवर देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी बांगरमऊचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरची जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली होती.
साक्षी महाराजांच्या ट्विटवर टीका करत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी 'लोकतंत्र के सबसे बड़े मंदिर में बैठने वाले सांसद ही जब बलात्कारियों का गुणगान करें, विजयी भव और लम्बी आयु की कामना करेंगे तो क्या ऐसे लोग बलात्कार के खिलाफ कानून बनाएंगे? ये हैं BJP से उन्नाव के सांसद साक्षी महाराज जो #unnaokibeti के बलात्कारी कुलदीप सेंगर को दुआ दे रहे है!' असे ट्विट केले. तसेच कुमार विश्वास यांनी ट्विट करत 'क्यूं नहीं मिलता #unnaokibeti को न्याय? 90 बलात्कार केस, निराला-चंद्रशेखर आज़ाद के उन्नाव में? आप सबकी उबल रही जिज्ञासा का शमन शायद वहां के सांसद जी के इस बधाई संदेश से हो जाए. पढ़िए और नेताओं-पार्टियों-जातियों के बंधक बनकर कुतर्क करिए! कुछ नहीं हो सकता हम सब का.' साक्षी महाराज यांच्या ट्विटवर खेद व्यक्त केला.