शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

भाजपातील ज्येष्ठांचा मोदींविरोधात फटाका

By admin | Published: November 11, 2015 3:04 AM

‘सामूहिक अपयशा’च्या नावाखाली बिहारमधील दारुण पराभवाची जबाबदारी टाळू पाहणाऱ्या भाजपातील तरुण तुर्कांवर लालकृष्ण आडवाणी यांच्यासह पक्षातील बहुतेक म्हाताऱ्या अर्कांनी घणाघाती टीकेचा वार केला.

नवी दिल्ली : ‘सामूहिक अपयशा’च्या नावाखाली बिहारमधील दारुण पराभवाची जबाबदारी टाळू पाहणाऱ्या भाजपातील तरुण तुर्कांवर लालकृष्ण आडवाणी यांच्यासह पक्षातील बहुतेक म्हाताऱ्या अर्कांनी घणाघाती टीकेचा वार केला. निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा, असा आग्रह धरत, पक्षातील ज्येष्ठांनी नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या नेत्यांनी कसलाही धडा घेतला नसल्याची टीकाही, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अडगळीत टाकल्या गेलेल्या ज्येष्ठांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे. परिणामी, बिहारचा पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपात असंतोषाचे स्वर मंगळवारी रात्री कमालीचे तीव्र झाले.लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारमधल्या पराभवासाठी कुणालाच जबाबदार न धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच तटस्थ समिती नेमून पराभवासाठी कोण जबाबदार आहे, याचा शोध घ्यायला पाहिजे, असे एकपानी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पराभवासाठी विशिष्ट कोणी जबाबदार नसून, ती सामूहिक जबाबदारी असल्याची भूमिका स्वीकारार्ह नाही, अशा कानपिचक्याही या ज्येष्ठांनी दिल्या आहेत. एकीकडे वाचाळवीरांना आवर घालण्याचे, तर दुसरीकडे ज्येष्ठांकरवी सुरू झालेला जाहीर पंचनामा रोखण्याचे दुहेरी आव्हान मोदी आणि शाह यांपुढे उभे ठाकले आहे. दिल्लीमध्ये फज्जा उडूनही त्यावरून काहीच धडे घेतले नाहीत, हे बिहारच्या निकालांवरून दिसते. बिहारमधील पराभवास सर्वच जबाबदार आहेत, असे म्हणणे म्हणजे कोणालाही जबाबदार न धरणे आहे. बिहारमध्ये पक्ष जिंकला असता, तर त्याचे श्रेय ज्यांनी घेतले असते, ते पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत, हाच याचा अर्थ होतो.गेल्या वर्षभरात पक्षाचा ज्या पद्धतीने शक्तिपात केला गेला, तेच या ताज्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. पराभव का झाला, काही मूठभर लोकांच्या मागे पक्षाला का फरफटवले गेले व पक्षातील सर्वसहमतीची परंपरा कशी नष्ट केली गेली, याचा सर्वंकष फेरविचार व्हायला हवा आणि ज्यांनी बिहारमध्ये पक्ष प्रचाराची धुरा सांभाळली व जे प्रचाराला जबाबदार होते, त्यांनी हा फेरविचार करता कामा नये.आतषबाजी सुरू झाली...दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरी आतषबाजी सुरू झाली आहे. आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही, असे टिष्ट्वट काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले.सध्या ज्यांच्या हातात पक्षातील सगळी सूत्रे एकवटली आहेत, त्या शाह व मोदींना योग्य तो संदेश जाईल, याची व्यविस्थत काळजी यामध्ये घेण्यात आली आहे. मूठभरांच्या हाती सारी सत्ता एकवटल्याबद्दलची नाराजी या चारही नेत्यांनी लपविलेली नाही. या ज्येष्ठांनी मंगळवारी एकत्र येत, बिहारच्या पराभवाची मीमांसा केली व आपली भूमिका पक्षाच्या व्यासपीठाऐवजी थेट प्रसिद्धी माध्यमांपुढे मांडली. या धुरिणांनी कुणाचे नाव नमूद केले नसले, तरी त्यांचा रोख मोदी व शाह यांवर होता.पत्रक आधीच फुटले?या पत्रकावर ११ नोव्हेंबर अशी पुढची तारीख आहे. तारीख चुकीची लिहिली गेली की, मोदी परदेश दौऱ्यावर जाण्याआधी पत्रक एक दिवस आधीच मुद्दाम ‘फोडले गेले’ हे स्पष्ट झाले नाही.