मुंबई/नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून काँग्रेसच्या हातातून आसाम आणि केरळ ही राज्ये गेली असली आणि भाजपला आसामची सत्ता मिळाली असली तरी प्रत्यक्षात २0१४ च्या तुलनेत यंदा भाजपच्या मतांमध्ये घट झाल्याचे आणि काँग्रेसची मते काही प्रमाणात वाढली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.केरळ आणि आसाम या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. ती दोन्ही राज्ये काँग्रेसकडून गेली. केरळमध्ये डाव्या आघाडीच्या, तर आसामात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. याउलट पुडुच्चेरी, ज्या अत्यंत लहान राज्यात रंगासामी काँग्रेस सत्तेवर होती, ते काँग्रेसकडे आले. बाकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन झालेच नाही. असे असले तरी यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसचे अधिक आहेत. ज्या केरळमध्ये काँग्रैसचा पराभव झाला, तिथे काँग्रेसचे २८ तर भाजपाचा एकच उमेदवार विजयी झाला. आसाममध्ये भाजपाला सत्ता मिळाली. तिथे भाजपाचे ६0 आणि काँग्रेसचे २६ उमेदवार निवडून आले. पुडुच्चेरीमध्ये काँग्रेसचे १५ जण निवडून आले. तिथे भाजपाने उमेदवारच उभे केले नव्हते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या वाट्याला ३, तर काँग्रेसच्या वाट्याला ४४ जागा आल्या. तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे ८ जण विजयी झाले, पण भाजपला तिथे खातेही उघडता आले नाही.म्हणजेच भाजपला या निवडणुकीत भाजपचे ६४ उमेदवारच निवडून आले. त्यातही ६0 एकट्या आसाममध्ये. तामिळनाडू आणि पुडुच्चेरीमध्ये भाजपाला प्रतिनिधीत्वही नाही. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवार विजयी झाले. > 05राज्यांतील विधानसभेच्या ८२२ जागा होत्या आणि भाजपाने ६६१ उमेदवार रिंगणात उतरवले. विजयी उमेदवारांचे प्रमाण सुमारे १0 ते ११ टक्के आहे. काँग्रेसचे याच राज्यांत मिळून ३४१ उमेदवार उभे होते. त्यापैकी १२२ उमेदवार निवडून आले. याचा अर्थ निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रमाणही २८ ते ३0 टक्क्यांच्या दरम्यान आहे.> पक्षीय बलाबलराज्यजागाभाजपाकाँग्रेसकेरळ140141(यूडीएफ)प. बंगाल294344आसाम1266026तामिळनाडू23208पुडुच्चेरी30015एकूण82264140
भाजपाचा टक्का कमी
By admin | Published: May 22, 2016 3:04 AM