Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 07:13 PM2024-11-11T19:13:18+5:302024-11-11T19:14:38+5:30

भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना याबाबत माहिती दिली.

BJP's run in Election Commission; Complaint filed against Rahul Gandhi | Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...

Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेटांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या दरम्यान, भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. जाहीर सभेत खोटे आणि बिनबुडाचे आरोप करुन भाजपची बदनामी केल्याची तक्रार भाजपने केली आहे. 

भाजपने काय तक्रार केली?
केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा खोटे बोलले. त्यांनी संविधानाबाबत खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत भाजप संविधान नष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यांचे हे विधान खोटे आणि निराधार आहे.

एफआयआर नोंदवण्याची मागणी
राहुल गांधींनी बिनबुडाचे आरोप थांबवावे, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. राहुल गांधींना असे आरोप करण्याची सवय आहे, असेही आम्ही आयोगाला सांगितले. इशारे व सूचना देऊनही ते आपले बिनबुडाचे थांबवत नाहीत. राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात यावी, अशी मागणी भाजपने आयोगाकडे केली आहे.

Web Title: BJP's run in Election Commission; Complaint filed against Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.